Sindhudurg: वेंगुर्ला येथे वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन

0
80
वेंगुर्ला येथे वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी- समस्त वेंगुर्ला तालुका वारकरी मंडळातर्फे २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत रात्रौ ७ ते ९ या वेळेत रामेश्वर मंदिर वेंगुर्ला येथे भव्य वारकरी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेताळ-प्रतिष्ठान-सिंधु/

दि.२८ फेब्रुवारी व दि. १ मार्च रोजी झी टॉकीज फेम युवा किर्तनकार ह.भ.प.संकेत महाराज यादव (फलटण) यांचे तर २ मार्च रोजी ह.भ.प.सुनिलजी महाराज मिरढेकर यांचे वारकरी कीर्तन होणार आहे. फलटण येथील ज्ञानकुर वारकरी शिक्षण संस्थेचे मृदंगाचार्य व गायनाचार्य हे कीर्तनाला साथ करणार आहेत. तरी श्रोत्यांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here